Playback
Actions
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCIYRukQtT8yLS3_5loN5olA/join
‘अभिजात मराठीचे प्राचीन स्वरूप आणि तिचे विस्तार-क्षेत्र’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न
बदलापूर, ७ ऑक्टोबर २०२६ :
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या राज्यभरात 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' (३ ते ९ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात सुरू आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरमध्ये आज सकाळी ११ ते १२ या वेळेत या विशेष व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यात आले.
या सत्रात सोलापूर येथील प्राकृत आणि अपभ्रंश भाषांचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री यांनी ‘अभिजात मराठीचे प्राचीन स्वरूप आणि तिचे विस्तार-क्षेत्र’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी भाषेच्या मुळांचा आणि तिच्या व्यापक पसाऱ्याचा अभ्यासपूर्ण वेध घेतला.
अभिजात मराठीचा समृद्ध भाषिक आणि प्राचीन साहित्यिक वारसा नव्या पिढीसमोर उलगडणे, तसेच भाषेविषयीची अस्मिता जागृत करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या ज्ञानवर्धक सत्राला बदलापूरकर नागरिकांचा आणि साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
#बदलापूर #अभिजातमराठी #मराठीभाषासप्ताह #मराठीभाषा #BadlapurTimes
BadlapurCity | City Portal
The portal is active since 2009 and managed by Badlapur's first IT Company.
badlapur.co.in











