Friday, April 17, 2026
HomeSports10% fare hike for st buses | एसटी बसची 10 टक्के भाडेवाढ

10% fare hike for st buses | एसटी बसची 10 टक्के भाडेवाढ



10 fare hike for st buses एसटी बसची 10.1578947368421&height=768&w=768&width=1368

राज्य (mahrashtra) परिवहन महामंडळाने (msrtc) प्रवासी भाड्यात 10 टक्के वाढ लागू केली आहे. तसेच त्यासोबतच प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे.

ही भाडेवाढ बुधवारपासून लागू झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी (passangers) नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच एसटी महामंडळाने भाडेवाढ (rates) केल्यानंतर हंगामी भाडेवाढ करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारांतून राज्याच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस धावतात.

वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत ही भाडेवाढ लागू राहणार आहे.

एसटीने काही महिन्यांपूर्वीच दरवाढ केली होती. आता हंगामी दरवाढ केल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

एसटी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वाढती इंधन किंमत, देखभाल खर्च आणि अतिरिक्त प्रवासी व्यवस्थापन यामुळे ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

उन्हाळी सुट्टीत वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे एसटी महामंडळाला या भाडेवाढीचा आर्थिक फायदा होणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीत भाडेवाढ न केल्याने झालेल्या महसुली तुटीची काही प्रमाणात भरपाई करण्याचाही हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

हा निर्णय महामंडळासाठी फायदेशीर ठरणार असला तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र नुकसानीचा ठरत आहे.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com