Sunday, November 16, 2025
HomeSportsTara bhawalkar's reaction to the compulsion of hindi language

Tara bhawalkar’s reaction to the compulsion of hindi language



Tara bhawalkars reaction to the compulsion of hindi language.1578947368421&height=814&w=768&width=1078

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या सक्तीविरोधात राज्यात (maharashtra) वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठी भाषेच्या (marathi language) मुद्द्यावर मोठं आंदोलन सुरू आहे. तसेच साहित्यिका आपला शासन पुरस्कार परत करत असल्याचेही समोर येत आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनं (mns) आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून आता ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रीभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रिभाषा सूत्र असे म्हणत मेक मारली आहे, असं भवाळकर यांनी म्हटलं आहे.

सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रिभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रिभाषा सूत्र असे म्हणत मेक मारली आहे, असा आरोप अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केला आहे.

तुम्हीच 3 री भाषा निवडा असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुरपणाने म्हंटले आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  लहान कोवळ्या मुलांवर अन्याय करू नका,  चौथीपर्यंत मातृभाषा शिकवावी आणि त्यानंतर अन्य भाषेबाबत विचार करावा.

माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र हिंदीची सक्ती करू नये, असं मत ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं आहे.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com