Tuesday, April 21, 2026
HomeSportsठाण्यात 900 खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल

ठाण्यात 900 खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल



ठाण्यात 900 खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल.1578947368421&height=625&w=768&width=1000

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या 900 खाटांच्या सिव्हिल हॉस्पिटलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार असून त्यामध्ये हेलिपॅडचीही सुविधा असेल.

ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात हे रुग्णालय उभारले जात आहे. सुमारे 10 मजली या इमारतीत आधुनिक पायाभूत सुविधा असणार असून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.

या रुग्णालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे छतावर उभारण्यात येणारे हेलिपॅड. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत एअर अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार असून गंभीर रुग्णांना तात्काळ उपचार मिळवणे अधिक सुलभ होईल.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसवली जाणार आहेत. यात MRI, CT स्कॅन मशीन, तसेच कॅन्सर उपचारासाठी केमोथेरपी आणि रेडिओथेरपी युनिट्सचा समावेश असेल.

हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर ठाणे आणि परिसरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

लोकलमध्ये गर्भवती महिलांसाठी विशेष डब्याची मागणी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com