Playback
Actions
*“वंदे मातरम” गीताच्या १५० वर्षानिमित्त विद्यार्थ्यांकडून स्फूर्तिदायक सादरीकरण*
इयत्ता 9वी व 10वी विभागात आज सकाळच्या प्रसन्न वातावरणात “वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रार्थनेच्या वेळेस इयत्ता दहावी मधील कुमारी सारंगी प्रभुदेसाई या विद्यार्थिनीसह सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे संपूर्ण “वंदे मातरम” गीत सादर केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. बुटेरे सर, पर्यवेक्षिका श्रीमती शेरेकर मॅडम, तसेच समस्त शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने शाळेच्या परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. गीत संपल्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक श्री.बुटेरे सर यांनी विद्यार्थ्यांना “वंदे मातरम” या गीताचा इतिहास आणि त्यामागील देशप्रेमाचा संदेश समजावून सांगत, देशभक्तीची भावना जोपासण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागाने उत्साहात पार पडला आणि शाळेत देशप्रेमाचा व अभिमानाचा भाव दाटून आला. 🇮🇳











