
दिवा (diva) स्थानकातून चालविण्यात येत असलेली रत्नागिरी पॅसेंजर दादर (dadar) स्थानकातून चालविण्याची मागणी होत आहे. मात्र या गाडीमुळे सहा ते सात गाड्यांना थांबवावे लागते.
यामुळे कुर्ला-परळ दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर ही गाडी दादर स्थानकातून सोडण्याचा विचार करण्यात येईल, अशी भूमिका मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून चालविण्यात येत असल्याने विविध संघटनांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत मध्य रेल्वेने (central railway) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोरोना नंतर 2021 मध्ये दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट करण्यात आली.
कुर्ला ते परळ दरम्यान पाचवी सहावी मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे.
ही मार्गिका पूर्ण होताच रत्नागिरी (ratnagiri) पॅसेंजर दादर स्थानकातून चालविण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही नीला यांनी सांगितले.
हेही वाचा


