Tuesday, March 31, 2026
HomeSportsCama hospital to launch genetic counseling department from april 1

Cama hospital to launch genetic counseling department from april 1



Cama hospital to launch genetic counseling department from april 1.1578947368421&height=773&w=768&width=855

मुंबईतील कामा हॉस्पीटलमध्ये 1 एप्रिल 2026 पासून नवीन Genetic Counseling Department सुरू होणार आहे. या विभागाच्या माध्यमातून आनुवंशिक (hereditary) आजारांचे निदान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. अनेक वेळा हे आजार लक्षात येत नाहीत, त्यामुळे त्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या विभागात लवकर निदान, समुपदेशन (counseling) आणि व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच गर्भावस्थेतील (prenatal) आणि नवजात (newborn) तपासण्या करून कुटुंबांना संभाव्य जोखमी समजून घेण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत केली जाईल.

येथे डाऊन सिंड्रम, थलेसिमिया (Thalassemia), अनेमिया (Sickle cell anemia) आणि टर्नर सिंड्रोम यांसारख्या महत्त्वाच्या आनुवंशिक आजारांचे निदान केले जाईल. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सल्ल्यासोबतच भावनिक आधारही दिला जाणार आहे.

या विभागाचे नेतृत्व Dr. Shabana Borate आणि Dr. Kshamata Kindre करणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्राधारित पद्धतींचा वापर केला जाईल. रुग्णालयाचे अधीक्षक Dr. Tushar Palwe यांनी सांगितले की, या सेवेमुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक मजबूत होईल. लवकर उपचार शक्य होतील आणि प्रगत जनुकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com