Wednesday, March 11, 2026
Home Blog Page 92

ICC New Stop Clock Rule in Test Cricket Know What Changed Marathi News | नव्या नियमाने खेळला जाणार टेस्ट क्रिकेट, ‘या’ चुकीबद्दल फील्डिंग करणाऱ्या संघाला बसणार दंड

0


ICC New Rules in Test Cricket: क्रिकेटचं विश्व सतत बदलत असतं आणि हे बदल खेळ आणखी रोचक बनवतात. अनेक नियम वेळेनुसार, खेळाडूंच्या वागणुकिणीसार  नवीन नियम आणणे आवश्यक असते. अशाच एका नव्या बदलाचा अनुभव आता टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. आयसीसीने टेस्ट मॅचेसमध्येही ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू केला आहे. हा नियम वनडे आणि टी-20 मॅचमध्ये आधीपासूनच आहे, पण आता तो टेस्ट क्रिकेटमध्येही लागू करण्यात आला आहे.

काय आहे हा नियम?

नव्या नियमानुसार, फील्डिंग करणाऱ्या संघाने एका ओव्हरच्या शेवटीनंतर एक मिनिटाच्या आत पुढचा ओव्हर सुरू करण्यासाठी तयार असायला हवं. जर संघ वेळेत तयार नसला, तर अंपायर त्या टीमला दोन वेळा वॉर्निंग देतील.

दोन वेळा वॉर्निंग, नंतर थेट 5 रनचा दंड!

जर दोन वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही संघ वेळेचा आदर करत नसेल, वेळेत पुढील ओव्हर सुरु करत नसेल तर त्याला दंड बसणार. हा दंड साधासुधा नसून थेट 5 रनची पेनल्टी फील्डिंग टीमवर लावली जाईल. याचा अर्थ असा की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच अतिरिक्त धावा जमा होतील.

80 ओव्हरपर्यंत नियम लागू, मग होईल रिसेट

हा नियम 80 ओव्हरपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर वॉर्निंग्स रिसेट केल्या जातील. याचाच अर्थ असा की पुन्हा नव्यानं वॉर्निंग दिल्या जातील.

ताजे उदाहरण… 

या प्रकरणाचे ताजे उदाहरण म्हणजे इंडिया वि. इंग्लंड टेस्ट मॅचमध्ये अंपायर्सनी बेन स्टोक्स आणि शुभमन गिलला वेळेच्या बाबतीत वॉर्निंग दिली होती.

कधीपासून आला नियम?

हा नियम आता अधिकृतपणे 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पासून लागू करण्यात आलेला आहे.

New Stop clock rule in test cricket After five run penalty on the bowling team | नव्या नियमाने खेळला जाणार टेस्ट क्रिकेट, ‘या’ चुकीबद्दल फील्डिंग करणाऱ्या संघाला बसणार दंड

0


What is Stop clock rule in test cricket: क्रिकेटचं विश्व सतत बदलत असतं आणि हे बदल खेळ आणखी रोचक बनवतात. अनेक नियम वेळेनुसार, खेळाडूंच्या वागणुकिणीसार  नवीन नियम आणणे आवश्यक असते. अशाच एका नव्या बदलाचा अनुभव आता टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. आयसीसीने टेस्ट मॅचेसमध्येही ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू केला आहे. हा नियम वनडे आणि टी-20 मॅचमध्ये आधीपासूनच आहे, पण आता तो टेस्ट क्रिकेटमध्येही लागू करण्यात आला आहे.

काय आहे हा नियम?

नव्या नियमानुसार, फील्डिंग करणाऱ्या संघाने एका ओव्हरच्या शेवटीनंतर एक मिनिटाच्या आत पुढचा ओव्हर सुरू करण्यासाठी तयार असायला हवं. जर संघ वेळेत तयार नसला, तर अंपायर त्या टीमला दोन वेळा वॉर्निंग देतील.

दोन वेळा वॉर्निंग, नंतर थेट 5 रनचा दंड!

जर दोन वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही संघ वेळेचा आदर करत नसेल, वेळेत पुढील ओव्हर सुरु करत नसेल तर त्याला दंड बसणार. हा दंड साधासुधा नसून थेट 5 रनची पेनल्टी फील्डिंग टीमवर लावली जाईल. याचा अर्थ असा की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच अतिरिक्त धावा जमा होतील.

80 ओव्हरपर्यंत नियम लागू, मग होईल रिसेट

हा नियम 80 ओव्हरपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर वॉर्निंग्स रिसेट केल्या जातील. याचाच अर्थ असा की पुन्हा नव्यानं वॉर्निंग दिल्या जातील.

ताजे उदाहरण… 

या प्रकरणाचे ताजे उदाहरण म्हणजे इंडिया वि. इंग्लंड टेस्ट मॅचमध्ये अंपायर्सनी बेन स्टोक्स आणि शुभमन गिलला वेळेच्या बाबतीत वॉर्निंग दिली होती.

कधीपासून आला नियम?

हा नियम आता अधिकृतपणे 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पासून लागू करण्यात आलेला आहे.

कर्नाक पूल 'या' आठवड्यात पुन्हा सुरू होणार

0



कर्नाक पूल 039या039 आठवड्यात पुन्हा सुरू होणार.1578947368421&height=1365&w=768&width=2048

मस्जिद बंदर येथील नवीन कार्नॅक पूल या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे. मध्य रेल्वेने मंगळवार, 24 जून रोजी अंतिम मंजुरी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले, ज्यामुळे शेवटचा अडथळा दूर झाला.

हा पूल दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडतो. तो ईस्टर्न फ्रीवे आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला जोडतो. परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे.

मूळ रचना 154 वर्षे जुनी होती, जी 1868 मध्ये बांधली गेली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये, स्ट्रक्चरल ऑडिटने पूल असुरक्षित घोषित केल्यानंतर तो पाडण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव 2014 पासून हा पूल जड वाहनांसाठी बंद होता.

पुलाच्या पुनर्बांधणीला अनेक विलंब झाले. यामध्ये जवळील अतिक्रमणे आणि चालू असलेला हॅनकॉक ब्रिज प्रकल्प यांचा समावेश होता. नवीन पुलाचे मुख्य बांधकाम 10 जून रोजी पूर्ण झाले. 15 जून रोजी भार चाचणी करण्यात आली. रेल्वेकडून प्रलंबित मंजुरीमुळे उद्घाटनाला विलंब झाला.

नवीन पुलावर 70 मीटर लांबी आणि 9.5 मीटर रुंदीची स्टीलची सुपरस्ट्रक्चर आहे. बांधण्यासाठी 60 कोटी रुपये खर्च आला. जुन्या पुलाच्या विपरीत, ज्यामध्ये फक्त दोन लेन होते, नवीन पुलात चार लेन आहेत. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.


हेही वाचा

फास्टॅग वार्षिक पास ‘या’ मार्गांवर लागू होणार नाही


कल्याण, ठाणे रेल्वे स्टेशनवरील शौचालयांचा कायापालट होणार

Tara bhawalkar’s reaction to the compulsion of hindi language

0



Tara bhawalkars reaction to the compulsion of hindi language.1578947368421&height=814&w=768&width=1078

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या सक्तीविरोधात राज्यात (maharashtra) वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठी भाषेच्या (marathi language) मुद्द्यावर मोठं आंदोलन सुरू आहे. तसेच साहित्यिका आपला शासन पुरस्कार परत करत असल्याचेही समोर येत आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसेनं (mns) आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून आता ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रीभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रिभाषा सूत्र असे म्हणत मेक मारली आहे, असं भवाळकर यांनी म्हटलं आहे.

सरकारने मोठ्या चतुरपणाने त्रिभाषिक अशी भाषा वापरली आहे, त्यांनी हिंदी भाषा सक्तीची असे कुठेही म्हटले नाही. त्रिभाषा सूत्र असे म्हणत मेक मारली आहे, असा आरोप अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केला आहे.

तुम्हीच 3 री भाषा निवडा असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चतुरपणाने म्हंटले आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  लहान कोवळ्या मुलांवर अन्याय करू नका,  चौथीपर्यंत मातृभाषा शिकवावी आणि त्यानंतर अन्य भाषेबाबत विचार करावा.

माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र हिंदीची सक्ती करू नये, असं मत ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं आहे.


हेही वाचा

wtc points table 2025 -27 updated england leads table and team india drop in 4th position

0


No match is being played.

Jun 20, 2025 | 1st Test

Anderson-Tendulkar Trophy, 2025

IND

(113 ov) 471

(96 ov) 364

VS

ENG

465(100.4 ov)

373/5(82 ov)

England beat India by 5 wickets
Full Scorecard →

Jun 19, 2025 | Match 4

Women’s T20I Pacific Cup, 2025

VAN-W

(113 ov) 471

(96 ov) 364

VS

SAM-W

465(100.4 ov)

373/5(82 ov)

Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs
Full Scorecard →

Jun 17, 2025 | Match 3

Women’s T20I Pacific Cup, 2025

SAM-W

(113 ov) 471

(96 ov) 364

VS

PNG-W

465(100.4 ov)

373/5(82 ov)

Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets
Full Scorecard →

कल्याण डोंबिवलीकरांचा रिक्षा प्रवास महागला

0



कल्याण डोंबिवलीकरांचा रिक्षा प्रवास महागला.1578947368421&height=1632&w=768&width=2448

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा रिक्षा प्रवास महागणार आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदी भागात शेअर रिक्षांच्या भाड्यात 3 ते 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मीटरप्रमाणेही 3 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी सरकारने भाडेवाढ जाहीर केली होती. मात्र, रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्षात आली नव्हती. आता जवळपास 95% रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेअर रिक्षांमध्ये प्रवासाचे अंतर लक्षात घेऊन 3 ते 5 रुपयांनी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.

कल्याण आरटीओ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने चाकरमानी राहतात. घर ते रेल्वे स्थानकांपर्यंत शेअर रिक्षाने प्रवास करतात. या भाडेवाढीचा फटका थेट सामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे.

कोरोना काळात रिक्षाचालकांनी शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ केली होती. तेव्हा देखील 3 ते 5 रूपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिक्षाचालकांनी 3 ते 5 रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.

सध्या एका बाजूचा प्रवास 15 रुपयांमध्ये होत आहे. आता 18 ते 20 रुपये मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे.

कल्याण आणि डोंबिवली परिसरात काही रिक्षा चालक आपल्या मनाप्रमाणे भाडे वसूल करतात. तर, काही कमी रिक्षाचालक मीटरप्रमाणे रिक्षा चालवतात. बाकीचे सरसकट मनाप्रमाणे भाडे प्रवाशांकडून घेतात. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो.


हेही वाचा

फास्टॅग वार्षिक पास ‘या’ मार्गांवर लागू होणार नाही


मेट्रो विस्तार प्रकल्पांसाठी 12,000 कोटी रुपयांच्या बजेटला मान्यता

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com