Thursday, March 5, 2026
Home Blog Page 11

ठाण्यातील बालकूम–साकेत मार्गावर वाहतूक निर्बंध

0



ठाण्यातील बालकूम–साकेत मार्गावर वाहतूक निर्बंध.1578947368421&height=768&w=768&width=1368

ठाण्यातील बालकूम येथील त्रिमंदिरामध्ये होणाऱ्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी बालकूम–साकेत रस्त्यावर निर्बंध जाहीर केले आहेत.

30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत बालकूम नाका ते कळवा क्रिकेट नाका दरम्यानच्या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.

त्रिमंदिर येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या काळात आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, ग्रीन कॉरिडॉरवरील वाहने तसेच जीवनावश्यक वायू वाहून नेणारी वाहने यांसह आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

नवे घनकचरा नियम लागू; मुंबईत चार प्रकारांत कचरा वर्गीकरण सक्तीचे

T20 World Cup 2026 Schedule: टी-20 वर्ल्डकपचं नवं शेड्यूल जारी, कोणता सामना कधी, कुठे आणि कोणासोबत? वाचा संपूर्ण Time Table

0


T20 World Cup 2026 Schedule: बांगलादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वर्ल्डकपचा महासंग्राम 7 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळला जाईल. भारत आणि श्रीलंकेतील विविध शहरांमध्ये हे सामने पार पडणार आहेत, ज्यात मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलंबो सारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Add Zee News as a Preferred Source
T20 World Cup 2026 Schedule टी 20 वर्ल्डकपचं नवं शेड्यूल जारी

बांगलादेश संघ बाहेर पडल्यानंतर स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडला बांगलादेशच्या गटात स्थान देण्यात आले आहे. स्कॉटलंड आता बांगलादेशचे सामने कोलकाता आणि मुंबईत खेळेल. इतर सर्व संघ टी-20 स्पर्धेत आहेत.

पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि भारत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरतील. भारतीय संघ 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध सामन्याने स्पर्धेला सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.

गट फेरीनंतर 21 फेब्रुवारीनंतर सुपर 8 चे सामने सुरू होतील. त्यानंतर 4  आणि 5 मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने खेळवले जातील. तर अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होणार आहे. पहिला उपांत्य फेरी आणि अंतिम सामना पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून असेल. जर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला तर सामने भारतात होतील.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण चर्चांना गती

0



दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण चर्चांना गती.1578947368421&height=897&w=768&width=1202

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) शरद पवार गट आणि अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा झाली आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय जिल्हा परिषद निवडणुकांनंतर घेतला जाणार आहे.

एनसीपी (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, एकतेकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने दोन्ही गटांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यानुसार पुणे आणि इतर शहरांतील महापालिका निवडणुका दोन्ही गटांनी संयुक्तपणे लढवल्या असून, अनेक ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्र लढवल्या जात आहेत.

शिंदे यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ही युती ही विलिनीकरणाच्या दिशेने हळूहळू टाकलेले पाऊल असून, निवडणुका पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील.

मात्र, अजित पवार गटातील काही नेते या विलिनीकरणाला विरोध करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील टप्प्यांतील निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील चर्चांवर अवलंबून असतील. या प्रक्रियेत सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचे पुत्र यांची भूमिकाही महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूका पुढे ढकलल्या


अजित पवार विमान अपघात: ब्लॅक बॉक्स सापडला

पश्चिम रेल्वेवर 'या' तारखेपासून 4 अतिरिक्त नॉन-एसी लोकल धावणार

0



पश्चिम रेल्वेवर 039या039 तारखेपासून 4 अतिरिक्त नॉन एसी लोकल धावणार.1578947368421&height=1632&w=768&width=2448

पश्चिम रेल्वे (WR) ने 1 फेब्रुवारी 2026 पासून 12 डब्यांच्या नॉन-एसी उपनगरीय लोकलच्या 4 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सेवांमुळे मुंबई उपनगरीय विभागातील पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांची संख्या 1406 वरून 1410 इतकी वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कांदिवली–बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे (6th Line) काम पूर्ण झाल्यामुळे या अतिरिक्त सेवा सुरू करणे शक्य झाले आहे. 

सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर बांद्रा टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बोरिवली ते बांद्रा टर्मिनसदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली आहे.

सुरू करण्यात येणाऱ्या 4 सेवांपैकी 2 सेवा अप (UP) दिशेने आणि 2 सेवा डाऊन (DOWN) दिशेने असतील, व त्या स्लो मार्गावरून धावतील.

अप दिशेतील सेवा भायंदर–बांद्रा (प्रस्थान वेळ 11.39) आणि भायंदर–चर्चगेट (प्रस्थान वेळ 12.14) अशी असेल.

तसेच डाऊन दिशेतील अतिरिक्त 2 सेवा बांद्रा–भायंदर मार्गावरून धावतील, ज्यांची प्रस्थान वेळ 04.30 आणि 13.21 अशी आहे.

या नव्या सेवांच्या समावेशामुळे काही विद्यमान लोकल सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा

मीरा-भाईंदरमधला डबल डेकर पूल चर्चेत


दोन्ही विमानतळे मेट्रोने जोडली जाणार

Deputy chief minister and ncp leader ajit pawar died in plane crash

0



Deputy chief minister and ncp leader ajit pawar died in.1578947368421&height=1584&w=768&width=1600

राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांचे अपघातात निधन झाले आहे. बारामतीत विमानाला अपघात झाल्याची बातमी सकाळी समोर आली. मुंबईमधून बारामतीमध्ये उतरताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अपघात झाला आहे.

28 जानेवारी सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं.

बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. 

अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. 


संजू OUT, श्रेयस अय्यर को मिलेगा मौका? चौथे टी20 में 2 बड़े बदलावों के साथ उतर सकती है टीम इंडिया; जानें कैसी होगी प्लेइंग XI

0


भारत और न्यूजीलैंड के बीच जारी पांच मैचों की टी20 सीरीज का चौथा मुकाबला 28 जनवरी (बुधवार) को खेला जाएगा. सूर्यकुमार यादव की कप्तानी वाली टीम इंडिया शुरुआती 3 मैच जीतकर सीरीज अपने नाम कर चुकी है. ऐसे में मेन इन ब्लू चौथे टी20 के लिए संजू सैमसन सहित 2 बड़े बदलाव कर सकती है. तो आइए जानते हैं कि सीरीज के चौथे मुकाबले में टीम इंडिया की प्लेइंग 11 कैसी हो सकती है. 

संजू सैमसन होंगे बाहर?

बता दें कि संजू सीरीज के शुरुआती तीनों मैचों में फ्लॉप नजर आए. तीन में से दो मैचों में तो संजू दहाई का आंकड़ा भी पार नहीं कर सके. नागपुर में खेले गए पहले टी20 में संजू 10 रन बनाकर पवेलियन लौटे थे. फिर दूसरे मुकाबले में संजू सिर्फ 06 रन बना सके. हद तो तब हो गई जब संजू तीसरे मैच में गोल्डन डक पर आउट हो गए. 

लगातार तीन मैचों में खराब प्रदर्शन के बाद प्लेइंग 11 में संजू की जगह को लेकर सवाल खड़े होने लगे. जहां एक तरफ संजू तीनों मैचों में फ्लॉप हुए, वहीं स्टार बल्लेबाज श्रेयस अय्यर तीनों ही मुकाबलों में बेंच गर्म करते नजर आए. ऐसे में यह लगभग साफ नजर आने लगा कि चौथे टी20 में संजू की जगह श्रेयस अय्यर को मौका दिया जा सकता है. 

अक्षर पटेल की भी हो सकती है वापसी

नागपुर में खेले गए पहले टी20 में अक्षर प्लेइंग भारत की 11 का हिस्सा थे. इसी मैच में अक्षर को उंगली पर इंजरी हुई थी. इसके बाद उन्होंने बाकी दोनों मैच मिस किए. अब तीसरे टी20 में उनकी वापसी हो सकती है. अक्षर को शिवम दुबे की जगह मौका दिया जा सकता है. 

चौथे टी20 के लिए भारत की संभावित प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, हर्षित राणा, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com