Wednesday, March 18, 2026
HomeSportsनवी मुंबईत सायन–पनवेल महामार्ग 'या' तारखेपर्यंत बंद

नवी मुंबईत सायन–पनवेल महामार्ग 'या' तारखेपर्यंत बंद



नवी मुंबईत सायन–पनवेल महामार्ग 039या039 तारखेपर्यंत बंद.1578947368421&height=1001&w=768&width=1500

मुंबई ट्राफिक पोलिस (Mumbai Traffic Police) यांनी अंधेरी पूर्वेतील साकीनाका परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत. MTNL जंक्शन रोड ते मिठी नदीदरम्यानच्या रस्त्यावर साइड स्ट्रिप आणि पेव्हर ब्लॉकचे काम होणार आहे. हा रस्ता 18 मार्च ते 31 मे दरम्यान वन-वे करण्यात येणार आहे.

या कालावधीत या मार्गावर फक्त विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल. तर हसनपाडा जंक्शनकडून MTNL जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक हसनपाडा रोडमार्गे वळवून पुढे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडने सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, नवी मुंबईतही 18 मार्च रोजी सायन–पनवेल महामार्गावरील काही भाग तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. नेरुळ येथील SBI कॉलनीजवळ पादचारी पूल उभारण्याच्या कामासाठी LP ब्रिज ते उरण फाटा ब्रिज दरम्यानचा रस्ता रात्री 12:10 ते पहाटे 4:00 या वेळेत पूर्णपणे बंद राहील.

ही माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरूपती काकडे यांनी दिली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा

सर्व लोकल्स 15 डबा करण्याची श्रीकांत शिंदेंची मागणी


मेट्रो लाईन 3 स्थानकांभोवती लोकल एरिया प्लॅन राबवणार

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com