बदलापूर, दि. ८ फेब्रुवारी २०२६ :
बदलापूर पश्चिम येथील पाटील मंगल कार्यालय येथे सकाळी ६:३० वाजता एकत्र येत “निसर्गप्रेमी इन्व्हायर्नमेंट फाउंडेशन” तर्फे आयोजित श्रमदान उपक्रम उत्साहात पार पडला. गेल्या चार वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या संस्थेने यंदाही वृक्षसंवर्धनाचा संकल्प अधिक जोमाने राबवला.
पावसाळ्यानंतर झाडांना पाण्याची अत्यंत गरज भासू लागते. कडक उन्हामुळे सुकण्याच्या मार्गावर असलेल्या झाडांना जीवनदान देण्यासाठी स्वयंसेवकांनी सकाळी ७ ते ९:३० या वेळेत पाचोन गावाशेजारील परिसरात श्रमदान केले. वृक्षांना पाणी देणे, तण काढणे, परिसर स्वच्छ ठेवणे अशी विविध कामे यावेळी करण्यात आली.
विशेष म्हणजे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. “झाडे लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
श्रमदानानंतर सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत भविष्यासाठी हिरवाई जपण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
या उपक्रमातील मान्यवर श्रमदाते:
अनिल लब्धे, सुभाष मासये, राजेश गुडाधे, विनय, रमेश्वर (राहुल) व्हटकर, माल्तेश हेब्बरे, मनोहर रामन, पौर्णिमा मनोहर, वैभव महाजन, राजेश एम. आपटे, ज्योती सोनवणे, प्रमोद कुलकर्णी, नरेंद्र शेटकर, सुनील भवाळ, राधिका शेट्टी, सचिन सावंत, नंदकुमार मिश्र, कृती मासये, दक्ष मासये, अरविंद पाटील.
संस्थेच्या वतीने सर्व श्रमदात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, वर्षभरातील प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास श्रमदानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, बदलापूर


