Tuesday, May 12, 2026
HomeSportsUse of mobile pumps for water pumping during the rainy season

Use of mobile pumps for water pumping during the rainy season



Use of mobile pumps for water pumping during the rainy.1578947368421&height=768&w=768&width=1368

यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे पाणी साचणाऱ्या (water logging) ठिकाणी मोबाईल पंप (mobile pump) बसवण्यात येणार आहेत.

7 झोनमध्ये प्रत्येकी एक पंप बसवण्यात येणार असून 250 क्युबिक मीटर ताशी पाणी उपसा करण्याची क्षमता मोबाईल पंपात असल्याचे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईत (mumbai) पाणी साचू नये, यासाठी प्लडिंग पाईटवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाते. मात्र यंदा 130 नवीन फ्लडिंग पाईटची निर्मिती झाली असून मुंबईत 561 फ्लडिंग पाईट आहेत.

पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये यासाठी 547 पंप बसवण्यात येणार आहेत. तरी काही ठिकाणी पंप बंद पडले अथवा तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्या ठिकाणी मोबाईल पंप उपलब्ध करण्यात येणार आहेत.

पालिकेच्या 7 झोनमध्ये प्रत्येकी एक मोबाईल पंप तैनात असणार आहे. तसेच युद्धपातळीवर नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. मिठीतील गाळ उपसण्यासाठी दोन कंत्राटदारांना काम देण्यात आले आहे.

मिठीच्या तीनही पॅकेज अंतर्गत आणि मोठ्या, छोट्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा. पाणी साचण्याच्या ठिकाणांबाबत कार्यवाही करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेच्या (bmc) हद्दीत आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एकूण 547 पंप बसवण्यात येणार आहेत.

तसेच ताशी 60 क्युबिक मीटर ते एक हजार क्युबिक मीटर क्षमतेने पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com