T20 World Cup 2026 Schedule: बांगलादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वर्ल्डकपचा महासंग्राम 7 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळला जाईल. भारत आणि श्रीलंकेतील विविध शहरांमध्ये हे सामने पार पडणार आहेत, ज्यात मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलंबो सारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
बांगलादेश संघ बाहेर पडल्यानंतर स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडला बांगलादेशच्या गटात स्थान देण्यात आले आहे. स्कॉटलंड आता बांगलादेशचे सामने कोलकाता आणि मुंबईत खेळेल. इतर सर्व संघ टी-20 स्पर्धेत आहेत.
पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि भारत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरतील. भारतीय संघ 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध सामन्याने स्पर्धेला सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.
The updated fixtures list for the Men’s #T20WorldCup 2026
More details https://t.co/M61nOzx2fF pic.twitter.com/deynITDuV3
— ICC (@ICC) January 24, 2026
गट फेरीनंतर 21 फेब्रुवारीनंतर सुपर 8 चे सामने सुरू होतील. त्यानंतर 4 आणि 5 मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने खेळवले जातील. तर अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होणार आहे. पहिला उपांत्य फेरी आणि अंतिम सामना पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून असेल. जर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला तर सामने भारतात होतील.


