Friday, February 6, 2026
HomeSports24-hour water cut in thane, including mulund

24-hour water cut in thane, including mulund



24 hour water cut in thane including mulund.1578947368421&height=460&w=768&width=817

मुलुंडमध्ये (mulund) वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील 12 जलजोडण्या मुख्य जलवाहिनीवर स्थलांतरित करण्यासाठी पाणीपुरवठा (water supply) बंद करण्यात येणार आहे.

तसेच भांडुपमधील (bhandup) खिंडीपाडातील जलवाहिनीला लोखंडी झाकण बसवण्यासाठी मंगळवार, 27 जानेवारीला सकाळी 10 ते बुधवार, 28 जानेवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

या कामामुळे मुलुंड व भांडुपसह ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद (water cut) राहणार आहे.

मुलुंडमधील अमरनगर, गरखाचाळ, जय शास्त्री नगर, पंचशील नगर, हनुमानपाडा, राहुल नगर, मुलुंड वसाहत, मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, योगी हिल, मॉडेल टाऊन मार्ग, बी. आर. मार्ग, वैशालीनगर, घाटीपाडा व गुरुगोविंद सिंग मार्ग लगतचा परिसर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता , लाल बहादूर शास्त्री मार्ग, जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग, गोशाळा मार्ग, नाहुरगाव येथे पाणीकपात केली जाणार आहे

भांडुपमधील खिंडीपाडा अ) लोअर खिंडीपाडा, ब) अप्पर खिंडीपाडा येेथे पाणीकपात केली जाणार आहे.

ठाण्यातील किसननगर (पूर्व), किसननगर (पश्चिम), भटवाडी येथे पाणीकपात केली जाणार आहे.

येथील प्रशासनाकडून रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com