Friday, February 6, 2026
HomeSportsind vs nz 3rd odi team india won toss and choose bowl...

ind vs nz 3rd odi team india won toss and choose bowl first arshdeep singh comes back in playing 11


IND VS NZ 3rd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा सामना हा इंदोर येथील स्टेडियमवर (Indor Stadium) खेळवला जातोय. यापूर्वी टीम इंडियाने सीरिजमधील पहिला सामना तर न्यूझीलंडने दुसरा सामना जिंकल्याने ही सीरिज  सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. तेव्हा दोन्ही संघांना ही सीरिज जिंकायची असेल तर त्यांना आजचा शेवटचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. 

Add Zee News as a Preferred Source
ind vs nz 3rd odi team india won toss and

इंदोर स्टेडियमवर तिसरा वनडे सामना खेळवला जाणार असून सामन्यापूर्वी झालेला टॉस टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने जिंकला. त्याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे न्यूझीलंडला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल. दुसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 च्या तुलनेत टी इंडियात एक बदल करण्यात आलाय. त्यानुसार प्रसिद्ध कृष्णा ऐवजी अर्शदीप सिंह हा प्लेईंग 11 चा भाग आहे. तर न्यूझीलंडने त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

हेही वाचा : KKR विरोधात कायदेशीर कारवाई करणार मुस्तफिजूर रहमान? IPL 2026 मधून वगळल्यानंतर दिली प्रतिक्रिया

 

भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडची प्लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झकरी फौल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडेन लेनोक्स

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com