Friday, May 29, 2026
HomeSportsMumbai traffic police announces odd-even parking rule on key roads in andheri...

Mumbai traffic police announces odd-even parking rule on key roads in andheri east till august 27



Mumbai traffic police announces odd even parking rule on key roads.1578947368421&height=1632&w=768&width=2448

मुंबई ट्राफिक पोलिसांनी Mumbai Traffic Police अंधेरी पूर्व MIDC परिसरातील सात महत्त्वाच्या रस्त्यांवर तात्पुरते ऑड-इव्हन पार्किंग नियम लागू केले आहेत.

हा आदेश वाहतूक विभागाचे उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी जारी केला असून तो 28 मे ते 27 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.

MIDC परिसरातील अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणाऱ्या पार्किंगमुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती. तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्किंगचे नियम

  • महिन्याच्या सम तारखांना वाहनं फक्त रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूला पार्क करता येतील.

  • महिन्याच्या विषम तारखांना वाहनं फक्त रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूला पार्क करता येतील.

  • नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

ज्या रस्त्यांवर नियम लागू

  • गुरु गोबिंद सिंग रोड (शेरे पंजाब रोड ते टोलानी कॉलेज)

  • कोंडिवटा रोड (अपना ढाबा ते पिडिलाइट कंपनी)

  • दत्ता जगदंबा मंदिर रोड (हनुमान मंदिर ते मालपा डोंगरी रोड)

  • सेंट्रल रोड (रोल्टा जंक्शन ते संविधान चौक)

  • बी क्रॉस रोड (रोड क्रमांक 7 ते आकृती रोड, स्टार बिल्डिंग)

  • सुरेन रोड (एल अँड टी कंपनी ते TCS कंपनी)

  • रोड क्रमांक ११ (सेंट्रल रोड MIDC ते महाकाली केव्ह रोड)

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नवीन पार्किंग नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com