
पश्चिम उपनगरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मास्टिक डांबरचा वापर करण्यात येणार आहे. पावासाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल 7 कोटी 40 लाख रुपये खर्च करणार आहे.
पश्चिम उपनगरातील झोन-4 अंतर्गत येणाऱ्या के/पश्चिम, पी/दक्षिण आणि पी/उत्तर विभागांतील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक डांबरचा (mastic dambar) वापर करण्यात येणार आहे.
9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसह 6 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या गल्ली व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे (potholes) बुजविण्यासाठी 3 कोटी 52 लाख रुपयांची ई-निविदा काढण्यात आली आहे.
तसेच 9 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्रपणे 3 कोटी 88 लाख रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
मान्सून काळात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही कामे हाती घेण्यात येत आहेत.
विशेषतः पश्चिम उपनगरातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य मार्गांवर मॅस्टिक डांबर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने रस्ते अधिक टिकाऊ राहतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
असे होणार काम
9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी – 3.52 कोटी
9 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांसाठी – 3.88 कोटी
एकूण अंदाजित खर्च : 7.40 कोटी
संबंधित विभाग : के/पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर
कामाचा कालावधी : मान्सूनपूर्व, मान्सूनदरम्यान व मान्सूननंतर
हेही वाचा


