बदलापूर:
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र येणार असून, या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झेंडा नक्कीच फडकणार आहे, आणि नगराध्यक्षही शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर रणरागिणी किशोरीताई पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे शिवसेना युवा सेनेचे सचिव भावेश तांबे आणि दक्षता तांबे शिवसेना महिला ग्राहक संघटनेचे शहराध्यक्ष आणि बाल हक्क संरक्षण संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या कार्यालयाचे उद्घाटन संध्याकाळी चितामणी चौक, बदलापूर पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या रणनितीबाबत भाष्य करताना सांगितले की, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राची गरज आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरही आघाडीचा झेंडा निश्चितच फडकणार असून,
शहरातील शिवसेना पक्ष वाढत असून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज असून जनतेचा विश्वास अधिकाधिक मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे शहरप्रमुख किशोर दादा पाटील यांनी
सांगितले. आज बदलापूरमध्ये शिवसेना बळकट होत असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना लढणार असून, महाविकास आघाडी यामध्ये पूर्ण सहकार्य करेल याची खात्री आहे, असे ते म्हणाले.





उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तरे मामा, ठाणे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, शहर प्रमुख किशोर पाटील, माझी उपनगराध्यक्ष आणि जिल्हा संघटक प्रियाताई गवळी जिल्हा बदलापूर संपर्कप्रमुख प्रशांत पलांडे गोपालदादा खाडे (मुंबई), जिल्हा महिला संघटक रेखाताई कंठे, स्वप्नील शिंदे, विशाल पाटील, गणेश गधरी, विष्णू सानप, संजय. युवासेना तालुका अधिकारी कृष्ण धुमाळ, उपतालुका प्रमुख देविदास मसाणे, स्वप्नील शिंदे, विशाल पाटील, गणेश गधरी, विष्णू सानप, संजय कुलकर्णी, विजय वैद्य, जय शिंदे, सुनील अहिर, भावना पाटील, रोहन उभरे, बिभीषण कांबळे, पंढरीनाथ भोर, शाहरूख शेख, प्रवीण मोर्वकर, सुदेश कांबळे, प्रवीण तायडे, वंदना चौधरी, सुरेख सरवदे, संपदा लोहंडे, दत्ता गोवळकर, दत्त गायकर, सुनीता लोखंडे, जिजाबाई वेडसरी, अक्षय वाजे, नयन, प्रवीण पडवळ, संतोष राणे,गोरख कलेवर, भारती सरोदे, सुनील दळवी, बालाजी एकबोटे, बालकृष्ण लिगम, मानसी कदम, श्रद्धा पवार, सिंधू मोरे, संगीता खोब्रागडे, अदिती बरे, हेमंत पाटील, दीपा मर्ढेकर, जानवी चव्हाण, रूपा शिर्के, संध्या विश्वकर्मा, योगिता भुजबळ, सुषमा , सुप्रीत पुजारी, आदींची उपस्थिती होती .
कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या आणि सेवाभावी दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या जनसंपर्क कार्यालयामुळे नागरिकांचे प्रश्न लवकर मार्गी लागतील असा लोकांना आशा आहे