Thursday, July 10, 2025
HomeSportsमुंबईतील मालमत्ता कर वाढण्याची शक्यता

मुंबईतील मालमत्ता कर वाढण्याची शक्यता



मुंबईतील मालमत्ता कर वाढण्याची शक्यता.1578947368421&height=1632&w=768&width=2448

महाराष्ट्र सरकारने नुकताच रेडी रेकनर रेट (RRR) वाढीचा निर्णय घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शासनाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय होता. रेडी रेकनर रेट वाढल्याने त्याचा मालमत्ता करावरही परिणाम होणार आहे.

रेडी रेकनरचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील सगळ्या महापालिका क्षेत्रांत मालमत्ता कर वाढणार आहे. हा कर 8 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई बाबत बोलायचे झाल्यास गेल्या 10 वर्षात मालमत्ता कर वाढवण्यात आलेला नाही. मात्र रेडी रेकनरचे दर बदलल्याने आता मालमत्ता कर आपोआप वाढणार आहे. 

एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीमध्ये मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले की, मुंबईच्या सध्याच्या मालमत्ता कराच्या दरांमध्ये आतापर्यंत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेतर्फे आकारला जाणार अधिभार आहे. हे दर ठरवण्यामागील एक महत्त्वाचा भाग रेडी रेकनर दर असतात. हे दर म्हणजे एखाद्या मालमत्तेचे राज्य शासनाने ठरवलेले किमान मालमत्ता मूल्य असते. 

गगराणी यांनी म्हटले की, मुंबई महापालिकेने कोणतीही दरवाढ केलेली नाही. मुंबईतील मालमत्ता कर हा थेट रेडी रेकनर दरांशी निगडीत असतो.

रेडी रेकनर दरात वाढ झाल्याने मालमत्ता करातही वाढ होण्याची शक्यता आहे. या करवाढीनंतर कोणाला किती कर बसतो याचा तपशील चालू आर्थिक वर्षातील बिलातूनच कळू शकणार आहे.


हेही वाचा

दक्षिण मुंबईतील 59 नवीन ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com