Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 85

मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली?

0



मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली.1578947368421&height=768&w=768&width=1368

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारीही (18 ऑगस्ट 2025) आपला जोर कायम ठेवला. सकाळी 6:00 ते दुपारी 2:00 या वेळेत मुंबईतील विविध भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. प्रभागनिहाय (Ward-wise) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दादर, चेंबूर आणि वर्सोवा परिसरात सर्वाधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात सर्वाधिक पाऊस दादरमधील एसडब्ल्यूडी वर्कशॉप येथे झाला आहे. इथे 173.4 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ वरळी फायर स्टेशन येथे 170.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय  बी नाडकर्णी पार्क म्युनिसिपल स्कूल, वडाळा येथे 165.0 मिमी आणि आदर्श नगर स्कूल, वरळी येथे 161.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरात (Eastern Suburbs) चेंबूरमधील फायर स्टेशन येथे 177.2 मिमी पावसाची नोंद झाली असून, हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. नूतन विद्या मंदिर येथे 147.4 मिमी, विक्रोळी पश्चिम येथील बिल्डिंग प्रपोजल ऑफिस येथे 145.8 मिमी आणि चेंबूरमधीलच कलेक्टर कॉलनी येथे 145.6 मिमी पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरात (Western Suburbs) वर्सोवा डब्ल्यूडब्ल्यूटीएफ आणि लगून्स येथे 149.4 मिमी पाऊस झाला. बांद्रा फायर स्टेशन येथे 145.0 मिमी, वर्सोवा पंपिंग स्टेशन येथे 137.4 मिमी, खार दांडा म्युनिसिपल स्कूल, पाली हिल येथे 131.0 मिमी आणि बीकेसी फायर स्टेशन येथे 127.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर


मुसळधार पावसात चेंबुरमध्ये भिंत कोसळली

मुंबईसह 'या' जिल्ह्यात उद्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर

0



मुंबईसह 039या039 जिल्ह्यात उद्या शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर.1578947368421&height=768&w=768&width=1368

मंगळवारी देखील मुंबई आणि इतर जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला मंगळवारी (उद्या) सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई महापालिकेने तसा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवारी मुंबई महानगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा या उद्या बंद राहातील.

शिवाय नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे. गरज असल्या शिवाय कुणी ही बाहेर येवू नये असं सांगण्यात आले आहे. 

मुंबई प्रमाणे ठाणे, कल्याण, नवी मुंबई, आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना ही स्थानिक प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात ही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन उद्याच्या स्थिती नुसार घेईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार या जिल्ह्यातमध्ये शाळा कॉलेज उद्या बंद राहातील.


हेही वाचा

मुंबईकरांनो संभाळून! 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी

Mumbai monsoon updates chembur retaining wall collapses, damages 7 slum houses no casualties reported

0



Mumbai monsoon updates chembur retaining wall collapses damages 7 slum.1578947368421&height=406&w=768&width=277

17 ऑगस्ट 2025 च्या संध्याकाळी चेंबूर (chembur) वाशीनाका जवळील अशोक नगर परिसरात एमएमआरडीएने (mmrda) बांधलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसात कोसळली (wall collapse), ज्यामुळे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीतील किमान सात घरांचे नुकसान झाले.

ही घटना संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आणि यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. कारण रहिवासी वेळेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तातडीने मदत केली, ढिगारा साफ केला आणि बाधित कुटुंबांना जवळच्या मारवली चर्च परिसरात तात्पुरते स्थलांतरित केले.

पावसाळ्यात (mumbai rains) मुंबईच्या (mumbai) डोंगराळ भागात इमारती कोसळणे तसेच भूस्खलन होण्याच्या घटना दिसून येतात. उल्लेखनीय म्हणजे, याच भागात 2021 मध्ये भीषण भूस्खलन झाले होते. ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला होता, तरीही अनेक रहिवासी अजूनही धोकादायक परिस्थितीत राहत आहेत.

यावेळी जलद कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी, अशा घटनांच्या पुनरावृत्तीमुळे क्षेत्रातील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.


हेही वाचा

Creation of kolhapur bench of bombay high court

0



Creation of kolhapur bench of bombay high court.1578947368421&height=1024&w=768&width=1536

राज्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कोल्हापूर (kolhapur) खंडपीठ बांधले जात आहे. ही न्यायव्यवस्था वकिलांसाठी नाही तर गरिबांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.

शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत समान न्याय मिळावा यासाठी सर्किट बेंच बांधण्यात आला आहे. आता उच्च न्यायालयाने खंडपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करावा आणि ही मागणीही लवकरच पूर्ण होईल, असे मुख्य न्यायाधीश भूषण गवई म्हणाले.

कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल, त्यासाठी मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाचे (bombay high court) मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी प्रयत्न करावेत.

मुंबई उच्च न्यायालयाने सर्किट बेंचचे लवकरात लवकर नियमित खंडपीठात रूपांतर करण्यासाठी आवश्यक ते करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्य न्यायाधीश गवई म्हणाले की, गेल्या 25 वर्षांपासून ते स्वतः या 43 वर्षांच्या खंडपीठाच्या लढाईत सहभागी आहेत. मुख्यमंत्री फडणवीस 2014 पासून या लढाईत आहेत. म्हणून, सर्किट बेंच तयार झाल्यानंतरच ते कोल्हापूरला येतील असे मी म्हटले होते. न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणावर मी नेहमीच भर दिला आहे.

तर, उच्च न्यायालय आणि राज्य सरकारने हा निर्णय अतिशय कमी वेळात अंमलात आणला आहे. आज ते वचन पूर्ण होत आहे याचा त्यांना आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा

Bmc announces 18-hour water cut in t ward mumbai

0



Bmc announces 18 hour water cut in t ward mumbai.1578947368421&height=460&w=768&width=817

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) वर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पाईपलाईनचे (Pipeline) नुकसान झाले आहे. यामुळे बृहन्मुंबई (mumbai) महानगरपालिकेने (bmc) T वॉर्ड (मुलुंड) मध्ये एक मोठा पाणी पाईपलाईन वळवण्याचा प्रकल्प आखला आहे.

गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत वॉर्डातील काही भागात पाणीपुरवठा (water supply) होणार नाही

दरम्यान नवीन पाईपलाईन पुनर्संचयित झाल्यानंतर किमान 4 ते 5 दिवसांपर्यंत त्यांचे पिण्याचे पाणी उकळून फिल्टर करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) केले आहे.

बांधकाम कामामुळे प्रभावित झालेल्या मॅरेथॉन मॅक्सिमा बिल्डिंग आणि तानसा ब्रिज दरम्यानच्या मार्गावरील पाईपलाईनची पुनर्रचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने करणार आहे

बांधकाम कामामुळे प्रभावित झालेल्या मॅरेथॉन मॅक्सिमा बिल्डिंग आणि तानसा ब्रिज दरम्यानच्या मार्गावरील पाईपलाईनची पुनर्रचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे.

बाधित भागात मुलुंड (पश्चिम) मधील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड), जवाहरलाल नेहरू मार्ग (जेएन रोड), देवीदयाळ मार्ग, क्षेपनभूमी (डंपिंग ग्राउंड रोड), डॉ. आरपी मार्ग, पीके मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग (एम. जी. रोड), एनएस मार्ग, एसएन मार्ग, आरएचबी मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्हीपी मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बीआर मार्ग, गोशाळा मार्ग, एसएल मार्ग आणि नाहूर गाव यांचा समावेश आहे.


हेही वाचा

वनडे में इन तीन देशों से ज्यादा शतक तो, कोहली-सचिन-रोहित के नाम; हैरान कर देंगे ये आंकड़ें

0


वनडे क्रिकेट के इतिहास में सबसे ज्यादा शतक लगाने के मामले में विराट कोहली-सचिन तेंदुलकर और रोहित शर्मा टॉप-3 पर हैं. इन तीनों खिलाड़ियों ने तो वनडे में तीन देशों से ज्यादा शतक ठोके हैं.

वनडे क्रिकेट के इतिहास में सबसे ज्यादा शतक लगाने के मामले में विराट कोहली-सचिन तेंदुलकर और रोहित शर्मा टॉप-3 पर हैं. इन तीनों खिलाड़ियों ने तो वनडे में तीन देशों से ज्यादा शतक ठोके हैं.

वनडे क्रिकेट के इतिहास में सबसे ज्यादा शतक कोहली ने लगाए हैं. कोहली के नाम अब तक वनडे क्रिकेट में 51 शतक हैं. कोहली ने अब तक 302 मैच खेले हैं.

वनडे क्रिकेट के इतिहास में सबसे ज्यादा शतक कोहली ने लगाए हैं. कोहली के नाम अब तक वनडे क्रिकेट में 51 शतक हैं. कोहली ने अब तक 302 मैच खेले हैं.

वनडे क्रिकेट में शतक लगाने के मामले में दूसरे नंबर महान बल्लेबाज सचिन हैं. सचिन ने अपने 463 वनडे मैचों के करियर में 49 शतक जड़े हैं.

वनडे क्रिकेट में शतक लगाने के मामले में दूसरे नंबर महान बल्लेबाज सचिन हैं. सचिन ने अपने 463 वनडे मैचों के करियर में 49 शतक जड़े हैं.

तीसरे नंबर पर भारतीय वनडे टीम के कप्तान रोहित शर्मा हैं. रोहित ने अब तक भारत के लिए 273 वनडे मैच खेले हैं. इस दौरान रोहित ने 32 शतक ठोक दिए हैं.

तीसरे नंबर पर भारतीय वनडे टीम के कप्तान रोहित शर्मा हैं. रोहित ने अब तक भारत के लिए 273 वनडे मैच खेले हैं. इस दौरान रोहित ने 32 शतक ठोक दिए हैं.

अगर सचिन-रोहित और कोहली के शतक को मिला दिया जाए तो, कुल 132 शतक हो जाएंगे. तीनों खिलाड़ियों ने स्कॉटलैंड, आयरलैंड और अफगानिस्तान के शतक को मिला दें, तो भी उनसे ज्यादा शतक लगाए हैं.

अगर सचिन-रोहित और कोहली के शतक को मिला दिया जाए तो, कुल 132 शतक हो जाएंगे. तीनों खिलाड़ियों ने स्कॉटलैंड, आयरलैंड और अफगानिस्तान के शतक को मिला दें, तो भी उनसे ज्यादा शतक लगाए हैं.

ये रिकॉर्ड हैरान करने वाला है. लेकिन ये सच है. स्कॉटलैंड टीम की तरफ से 41 वनडे शतक लगे हैं. वहीं आयरलैंड से 53 और अफगानिस्तान से 37. तीनों टीमों के मिलाकर 131 शतक हैं. वहीं सचिन-कोहली और रोहित के कुल शतक 132 हैं.

ये रिकॉर्ड हैरान करने वाला है. लेकिन ये सच है. स्कॉटलैंड टीम की तरफ से 41 वनडे शतक लगे हैं. वहीं आयरलैंड से 53 और अफगानिस्तान से 37. तीनों टीमों के मिलाकर 131 शतक हैं. वहीं सचिन-कोहली और रोहित के कुल शतक 132 हैं.

Published at : 16 Aug 2025 04:28 PM (IST)


Preferred Sources

क्रिकेट फोटो गैलरी

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com