Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 72

अलिबागमध्ये पर्यटकांना दुचाकी भाड्याने घेता येणार

0



अलिबागमध्ये पर्यटकांना दुचाकी भाड्याने घेता येणार.1578947368421&height=792&w=768&width=978

अलिबागला (alibag) भेट देणाऱ्या पर्यटकांना आता गोवा आणि केरळप्रमाणे स्थानिक स्तरावरील प्रवासासाठी मोटारसायकल (bike) व स्कूटर (scooty) भाड्याने घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अलिबाग हे किनारी शहर असल्याने बरीच पाहण्यासारखी पर्यटन स्थळे येथे आहेत. तसेच शहराजवळील मुरुड-जंजिरा, रेवदंडा, काशीद बीच येथील पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

या ठिकाणी अलिबागहून जाण्यासाठी साधारणत: बस, रिक्षा तसेच इतर खाजगी वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र मोटारसायकल तसेच स्कूटरचा पर्याय उपलब्ध नसल्याने  ऑपरेटर्सना राज्य परिवहन विभागाने अधिकृत परवाने दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्र (maharashtra) राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑगस्टमध्ये ‘रेन्ट अ मोटरसायकल स्कीम, 1997’ अंतर्गत दोन परवाने मंजूर केले.

या योजनेनुसार नोंदणीकृत ऑपरेटरना ठराविक नियम व सुरक्षितता मानके पूर्ण केल्यानंतर तासावर किंवा दिवसावर दुचाकी पर्यटकांना व अल्पकालीन वापरकर्त्यांना भाड्याने देता येतात.

ही योजना 1997 मध्ये सुरू झाली होती. पहिल्या दहा वर्षांत काही परवाने दिल्यानंतर, महाबळेश्वरमध्ये टॅक्सी व रिक्षाचालकांच्या विरोधामुळे सरकारने 2015 मध्ये ही योजना स्थगित केली होती. मात्र, यावर्षी जूनमध्ये राज्य सरकारने नऊ वर्षांचा निर्बंध उठवला आणि पुन्हा या योजनेला मार्ग मोकळा करून दिला.


हेही वाचा

2041 पर्यंत मुंबईची पाण्याची तहान वाढणार

नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिराला जाणाऱ्यांसाठी जादा बसेस धावणार

नवरात्रीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीत बदल

0



नवरात्रीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीत बदल.1578947368421&height=540&w=768&width=960

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या कार्ला येथील एकविरा देवी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत, सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

मोटार वाहन कायदा, 1988चे कलम 115 तसेच शासन गृह विभागाचे 19/05/1990 चे अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

दि. 22 सप्टेंबर 2025 ते दि. 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कार्ला फाटा ते श्री. एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड आणि मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

दि. 27 सप्टेंबर 2025 ते दि. 01 ऑक्टोबर 2025 सकाळी 06.00 ते रात्री 22.00 या वेळेत जुना मुंबई–पुणे व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ या दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

जुना मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड आणि अवजड वाहने ही लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे वळविण्यात येतील. पुणे-मुंबईकडे जाणारी जड आणि अवजड वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविण्यात येतील.


हेही वाचा

म्हाडाच्या AI चॅटबॉटचे लोकार्पण


शिवाजी पार्क जिमखान्याला हेरिटेज लूक

India vs Oman Live Score: भारत और ओमान के बीच आज रात 8 बजे शुरू होगा मैच, जानें दोनों टीमों की प्लेइंग इलेवन

0


IND vs Oman Live Score Asia Cup 2025: भारत और ओमान के बीच आज शुक्रवार, 19 सितंबर को लीग स्टेज का आखिरी मुकाबला खेला जाएगा. टीम इंडिया लीग स्टेज के तीसरे मुकाबले में अपने पिछले दोनों मैच जीतकर पहुंची है. वहीं एशिया कप में पहली बार खेल रही ओमान की टीम अपने पिछले दोनों मुकाबले हार चुकी है. भारत इस मैच में जीत के साथ सुपर-4 में एंट्री करना चाहेगी. इस मैच के नतीजे से सुपर-4 की टीमों पर कोई असर नहीं पड़ेगा, क्योंकि टीम इंडिया के पहले ही इस रेस में आगे बढ़ चुकी है.

IND vs Oman, कितने बजे शुरू होगा मैच?

भारत और ओमान के बीच ये मैच अबू धाबी के शेख जायद स्टेडियम में खेला जाएगा. ये मैच अबू धाबी में शाम 6:30 बजे शुरू होगा. वहीं भारतीय समयानुसार ये मैच रात 8 बजे से शुरू होगा.

भारत की संभावित प्लेइंग इलेवन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कप्तान), तिलक वर्मा, संजू सैमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा और वरुण चक्रवर्ती.

ओमान की संभावित प्लेइंग इलेवन

आमिर कलीम, जतिंदर सिंह (कप्तान), हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), वसीम अली, हसनैन शाह, शाह फैसल, आर्यन बिष्ट, शकील अहमद, समय श्रीवास्तव और जितेन रामानंदी.

Mumbai high court receives another threatening email investigation ongoing

0



Mumbai high court receives another threatening email investigation ongoing.1578947368421&height=800&w=768&width=1198

हुतात्मा चौकातील (hutatma chowk) मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाच्या (bombay high court) इमारतीत बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा ईमेल (email) पुन्हा मिळाला. या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयात शोध मोहीम राबवली, परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही.

गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाला बॉम्ब ठेवण्याची धमकी (theatning) मिळाली होती आणि न्यायालय रिकामे करून तपासणी करण्यात आली.

शुक्रवारी, 19 सप्टेंबर रोजी सकाळी उच्च न्यायालयाला धमकीचा ईमेल मिळाला. त्या सकाळी उच्च न्यायालयात तातडीने चौकशी करण्यात आली. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. उच्च न्यायालयात कामकाज सुरळीत सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना एकाच दिवशी धमकीचे (bomb threat) ईमेल आले होते. दोन्ही प्रकरणांमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे.

परंतु आरोपीने डार्क नेट आणि व्हीपीएनचा वापर केला आहे, त्यामुळे त्याला पकडण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. शुक्रवारी आणखी एक धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

Passengers angered over central railway’s sector-wise local proposal

0



Passengers angered over central railways sector wise local proposal.1578947368421&height=768&w=768&width=1368

मेट्रो ट्रेन ऑपरेशन्सप्रमाणेच सेक्टर निहाय कॉरिडॉरमध्ये विभागून उपनगरीय रेल्वे व्यवस्थेचे आमूलाग्र बदल करण्याच्या मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई विभागाच्या वादग्रस्त प्रस्तावावर प्रवाशांकडून आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

गेल्या वर्षी रेल्वेमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावात सध्याच्या चालू नेटवर्कला आठ कार्यरत कॉरिडॉरमध्ये विभागून गर्दीच्या वेळेत उपनगरीय रेल्वेची वारंवारता दर तीन मिनिटाला एक लोकल करण्याचे उद्दिष्ट आहे.

यामध्ये सीएसएमटी-ठाणे (धीमी), ठाणे-कल्याण (धीमी), कल्याण-कसारा (धीमी), सीएसएमटी-कल्याण (जलद), सीएसएमटी-पनवेल (धीमी), बेलापूर-उरण (धीमी) आणि ठाणे-नेरुळ/वाशी (धीमी) असे इतर मार्ग असतील.

या प्रस्तावामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या कामकाजात बदल होऊ शकतो असा दावा सादरीकरणात केला जात असला तरी, लीक झालेल्या प्रस्तावावर तीव्र विरोध सुरू झाला आहे.

“हा प्रस्ताव पूर्णपणे मूर्खपणाचा आहे. ज्या व्यक्तीने तो तयार केला आहे त्याला मुंबईबद्दल काहीच माहिती नाही आणि त्याने कधीही मुंबई उपनगरीय नेटवर्कचा वापर केला नाही,” असे मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन म्हणाले.

नाव न सांगण्याच्या अटीवर मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “ही योजना कागदावर चांगली दिसत असेल, परंतु प्रत्यक्षात ती पूर्णपणे अव्यवहार्य आहे. ठाणे आणि कल्याण सारख्या वर्दळीच्या जंक्शनवर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात ट्रान्सशिपमेंट करावे लागेल.”


हेही वाचा

Mumbai congress slams fadnavis for ‘disrespecting’ shivaji maharaj in billboard row

0



Mumbai congress slams fadnavis for disrespecting shivaji maharaj in billboard.1578947368421&height=2048&w=768&width=1980

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी “देवाभाऊ” (devabhau) या शीर्षकाचा वापर करून स्वतःचा प्रचार करण्यासाठी शहरात जाहिरात फलक लावले.

तथापि, यापैकी अनेक जाहिरातींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची (chhatrapati shivaji maharaj) प्रतिमा देखील आहे. तसेच ती कचरा, घाण आणि अस्वच्छ परिस्थितीने भरलेल्या अयोग्य ठिकाणी लावण्यात आली आहेत.

उदाहरणार्थ, प्रभादेवी रेल्वे स्थानकावर घाणेरड्या गल्ल्यांमध्ये हे पोस्टर्स आढळून आले आहेत त्यावर लोक थुंकताना देखील दिसून आले आहे ज्यामुळे सर्व स्तरातून गंभीर टीका होत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला की मुख्यमंत्री (chief minister) देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक प्रचार मोहिमेमुळे महाराष्ट्राचे आदरणीय प्रतीक अपमानित होत आहे.

तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सपकाळ यांनी विचारले, “देवेंद्र फडणवीस, प्रसिद्धीच्या झोतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का केला जात आहे? थुंकण्यासाठी आणि कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागांवर त्यांची प्रतिमा लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”

“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे (maharashtra) प्रेरणास्थान आहेत, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांजवळ त्यांची प्रतिमा ठेवणे हा संपूर्ण राज्याचा अपमान आहे. सत्तेवर टिकून राहण्यासाठी महाराजांच्या प्रतिमेचा वापर करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत जाहीर माफी मागावी.”


हेही वाचा

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com