Monday, February 16, 2026
HomeSportst20 world cup 2026 ind vs pak pakistan won toss and choose...

t20 world cup 2026 ind vs pak pakistan won toss and choose bowl first no handshake


IND VS PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2026 मधील ग्रुप स्टेज सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळवला जातोय. श्रीलंकेच्या कोलंबो येथील मैदानात हा सामना पार पडत असून सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये टॉस झाला. हा टॉस पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीसाठी उतरावं लागेल. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादवने प्लेईंग 11 मध्ये दोन महत्वाचे बदल केले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
t20 world cup 2026 ind vs pak pakistan won toss

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये दोन महत्वाचे बदल : 

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा टॉस पाकिस्तान संघाने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाने मागच्या सामन्याच्या तुलनेत भारताविरुद्ध त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. तर टीम इंडियाने त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल केले. यात संजू सॅमसनच्या जागी अभिषेक शर्माला ओपनिंग फलंदाज म्हणून स्थान देण्यात आलंय. तर अर्शदीप सिंह ऐवजी कुलदीप यादवला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे. 

टीम इंडियाची प्लेईंग 11:

अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकिपर ), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव(c), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची प्लेइंग 11:

सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार ), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (डब्ल्यू), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com