Thursday, February 12, 2026
HomeSportsDog bites increase in thane

Dog bites increase in thane



Dog bites increase in thane.1578947368421&height=1121&w=768&width=1786

ठाणे (thane) जिल्ह्यात कुत्रा चाव्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 या एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये 67,112 नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे लागले आहे.

जिल्ह्यातील शहरी व दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कुत्रा चाव्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

उल्हासनगर-3 येथे सर्वाधिक 12594, तर भिवंडी (bhiwandi) उपजिल्हा रुग्णालयात 11793, उल्हासनगर-4 मध्ये 9788 आणि अंबरनाथ (ambernath) उपजिल्हा रुग्णालयात 8450 रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 5,157 रुग्णांवर रेबीज प्रतिबंधात्मक उपचार केले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रेबीज हा आजार एकदा बळावल्यास प्राणघातक ठरतो.

तसेच त्यामुळे कुत्रा किंवा कोणत्याही संशयित प्राण्याने चावा घेतल्यास जखम तात्काळ साबण व स्वच्छ पाण्याने धुवून, विलंब न करता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

कुत्रा चावल्याच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आपल्याकडे प्रतिबंधासाठी भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि नागरिकांची जागरूकता या तिन्ही बाबी समान महत्त्वाच्या आहेत.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com