Friday, August 1, 2025
HomeCityNewsBadlapurTimes| झोनो हेल्थच्या २००व्या मेडिकल स्टोअरचे भव्य उद्घाटन शिरगावात उत्साहात संपन्न

BadlapurTimes| झोनो हेल्थच्या २००व्या मेडिकल स्टोअरचे भव्य उद्घाटन शिरगावात उत्साहात संपन्न

बदलापूर पूर्व (शिरगाव) – औषध व आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या झोनो हेल्थ या अग्रगण्य संस्थेच्या २००व्या मेडिकल स्टोअरचे भव्य उद्घाटन नुकतेच बदलापूर पूर्व येथील शिरगावातील कै. मोहनशेठ राऊत चौकात उत्साहात पार पडले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते वरुण म्हात्रे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमात हितेश साळवे यांचाही सक्रीय सहभाग होता. स्थानिक नागरिक, व्यापारी, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक आणि झोनो हेल्थचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्यास साक्षीदार ठरले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना वरुण म्हात्रे यांनी झोनो हेल्थच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “झोनो हेल्थच्या या २००व्या स्टोअरच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत, दर्जेदार, विश्वासार्ह आणि परवडणारी औषध सेवा मिळणार आहे. आजच्या काळात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा ही गरज बनली आहे आणि झोनो हेल्थ ही गरज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे, ही बाब अत्यंत अभिनंदनीय आहे.” त्यांनी झोनो हेल्थच्या सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील यशासाठी शुभेच्छाही दिल्या.

झोनो हेल्थ ही संस्था गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये आपली सेवा प्रभावीपणे पोहचवत आहे. त्यांच्या ‘ग्राहकविश्वास, गुणवत्ता आणि तत्पर सेवा’ या तत्त्वांवर आधारलेले कार्य सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. याच विश्वासावर त्यांनी २०० स्टोअर्सचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले असून, शिरगाव येथील हे स्टोअर त्यांच्या कामगिरीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

हितेश साळवे यांनीही उपस्थितांना उद्देशून सांगितले की, “आरोग्य हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे. झोनो हेल्थने ग्रामीण व शहरी भागातही वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. शिरगावसारख्या ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध होणे ही स्थानिक जनतेसाठी खूप मोठी दिलासादायक बाब आहे.”

उद्घाटनप्रसंगी स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनीही झोनो हेल्थच्या सेवांचे स्वागत केले. “दर्जेदार औषधे योग्य किमतीत, विश्वासार्ह सेवा आणि योग्य मार्गदर्शन या सर्व गोष्टी एका छताखाली मिळणं ही गरज होती. झोनो हेल्थच्या स्टोअरमुळे ही गरज पूर्ण झाली आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.

या नव्या स्टोअरमध्ये आधुनिक औषध सेवा, ई-प्रिस्क्रिप्शन सुविधा, घरपोच औषध पुरवठा आणि प्रशिक्षित फार्मासिस्ट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना वेळ आणि खर्च वाचणार असून त्यांना अधिक योग्य सल्लाही मिळेल.

झोनो हेल्थकडून या स्टोअरच्या माध्यमातून स्थानिक लोकांसाठी आरोग्य शिबिरे, मोफत सल्ला, आरोग्य जनजागृती मोहिमा यांचे आयोजन करण्याचाही मानस असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. “आमचे उद्दिष्ट केवळ औषधे विकणे नसून, लोकांना सशक्त व निरोगी बनवणे आहे,” असे झोनो हेल्थच्या स्थानिक व्यवस्थापकांनी सांगितले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात झोनो हेल्थकडून घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल स्थानिक लोकांसाठी एक मोठी उपलब्धी ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

बदलापूरसारख्या वाढत्या शहरात, जिथे औषध व वैद्यकीय सेवा ही मोठी गरज आहे, अशा ठिकाणी झोनो हेल्थचे २००वे स्टोअर उघडणे ही केवळ व्यवसायिक प्रगती नाही, तर एक सामाजिक बांधिलकीही आहे. हे स्टोअर दर्जेदार, परवडणाऱ्या आणि तत्पर औषध सेवा देत आरोग्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करेल, याची खात्री वाटते.

प्रतिनिधी – योगेश जनार्दन येलवे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com