Saturday, August 2, 2025
HomeSportsFlights from mumbai to ahmedabad cancelled

Flights from mumbai to ahmedabad cancelled



Flights from mumbai to ahmedabad cancelled.1578947368421&height=768&w=768&width=1368

अहमदाबादमधील (ahmedabad) सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (SVPIA) सर्व सेवा तात्काळ स्थगित करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ बंद घोषित करण्यात आले आहे, पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात (cancelled) आली आहेत.

फ्लाईट एआय171 हे विमान 242 जणांना घेऊन जात होते. त्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. जेव्हा ते विमानतळाच्या परिघाबाहेर असलेल्या मेघानी नगर परिसरात कोसळले. हे विमान अहमदाबादच्या मेघानीनगरच्या धारपूरमधील एका रहिवासी इमारतीवर कोसळलं आहे. 

व्हीटी-एएनबी म्हणून नोंदणीकृत असलेले बोईंग 787 विमान भारतीय वेळेनुसार दुपारी 1:39 वाजता रनवे 23 वरून निघाले होते आणि काही क्षणांतच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटण्यापूर्वी मेडे कॉल जारी केला.

या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. तसेच मुंबईहून (mumbai) अहमदाबादच्या दिशेने जाणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (csmia) प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com