Thursday, July 31, 2025
HomeSportsमध्य रेल्वेवर 6 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेवर 6 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक



मध्य रेल्वेवर 6 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक.1578947368421&height=447&w=768&width=797

मध्य रेल्वेवरील कल्याण आणि कर्जत दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या भागात 400 केव्ही क्रॉसिंगसाठी 3 फेज डबल सर्किट फेज आणि अर्थ कंडक्टर काढण्यासाठी स्ट्रिंग करण्यात येणार आहे, याच कारणामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन साऊथ ईस्ट लाईनवर 6 दिवसांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे कल्याण कर्जत विभागातील भिवपुरी रोड -कर्जत विभागात हा विशेष ब्लॉक असणार आहे.
भिवपुरी रोड-कर्जतमधील किमी क्रमांक 97/8-9 येथे अप आणि डाऊन साऊथ ईस्ट मार्गिकेवर क्रॉसिंग 400 केव्ही नागोठणे – पडघा मार्गिकेसाठी 3 फेज डबल सर्किट फेज आणि अर्थ कंडक्टर काढण्यासाठी आणि स्ट्रिंग करण्यासाठी हा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. हा ब्लॉक रात्रीच्या वेळेस असणार आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवपुरी रोड ते कर्जत या दरम्यान, 29 एप्रिलच्या रात्रीपासून 5 मे पहाटेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक दररोज रात्री रात्री 2 वाजल्यापासून रात्री 3.30 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात वरील कामे केली जाणार आहेत. या ब्लॉकमुळे बऱ्याच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

पुढील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

  • 11020 (भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)
  • 18519 (विशाखपट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस)
  • 12702 (हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)
  • 11140 (होसपेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)
  • 22718 (सिकंदराबाद – राजकोट)
  • 16614 (कोयंम्बत्तूर – राजकोट)
  • 20967 (सिकंदराबाद – पोरबंदर)
  • 12755 (काकिनाडा फोर्ट – भावनगर)

भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यानच्या या ब्लॉमुळे वरील मेल/एक्सप्रेस गाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवल्या जाणार आहेत, या गाड्या 20-30 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


हेही वाचा

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं मिळणार



Source link

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com