Saturday, March 7, 2026
HomeSportsMumbai-ahmedabad special train from western railway for cricket fans

Mumbai-ahmedabad special train from western railway for cricket fans



Mumbai ahmedabad special train from western railway for cricket fans.1578947368421&height=768&w=768&width=1368

टी-20 विश्वचषक 2026 (T20 world cup) च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

हीच गोष्ट लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल (mumbai central) आणि अहमदाबाद (ahmedabad) दरम्यान विशेष सुपरफास्ट गाड्या (special trains) चालवण्याची घोषणा केली आहे.

पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सामना पाहण्यासाठी मुंबई (mumbai) आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहेत.

तसेच त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास पर्याय उपलब्ध होणार असून गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान दोन अतिरिक्त सुपरफास्ट विशेष गाड्या निवडक तारखांना चालवण्यात येणार आहेत.

गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • गाडी क्रमांक 09027 – शनिवार, 7 मार्च 2026 रोजी रात्री 11.45 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.

  • गाडी क्रमांक 09028 – सोमवार, 9 मार्च 2026 रोजी पहाटे 3.00 वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि सकाळी 11.15 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल.

  • गाडी क्रमांक 09021 – रविवार, 8 मार्च 2026 रोजी सकाळी 6.20 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटेल आणि दुपारी 12.40 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.

  • गाडी क्रमांक 09022 – रविवार, 8 मार्च 2026 रोजी दुपारी 3.10 वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि रात्री 9.45 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com