Wednesday, February 25, 2026
HomeSportsThe roar of the lion of gujarat will soon be heard in...

The roar of the lion of gujarat will soon be heard in rani bagh



The roar of the lion of gujarat will soon be.1578947368421&height=768&w=768&width=1368

भायखळा (byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच गुजरातच्या सिंहांची गर्जना कानी पडणार आहे.

मुंबईच्या (mumbai) महापौर रितू तावडे यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून सिंह (lion) देण्याची मागणी करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

पालिकेच्या या उद्यान व प्राणिसंग्रहालयात 15 पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत.

याशिवाय 256 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.

त्यामुळे लहानांसह मोठ्यांनाही राणी बाग (Rani Baugh) नेहमीच खुणावत आली आहे. परंतु आता राणी बागेतील प्राणिसंग्रहालयात गुजरातच्या सिंहांची डरकाळी कानी पडणार आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून राणीच्या बागेसाठी सिंहांची मागणी करणार आहेत.

गुजरात राज्यात आशियाई सिंहांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे एक किंवा दोन सिंह मुंबईला देण्याची विनंती या पत्रातून केली जाणार आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत सिंहांसाठी आवश्यक जागा आणि सुविधा उपलब्ध असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून राणीच्या बागेत मोठा नवीन प्राणी दाखल झालेला नाही.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com