Monday, December 22, 2025
HomeSportsमुंबईत महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ

मुंबईत महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ



मुंबईत महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ.1578947368421&height=768&w=768&width=1368

मुंबईत अलीकडे महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फक्त 36 दिवसांत म्हणजे 1 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान मुंबई पोलिसांनी एकूण 82 जण बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. त्यापैकी 60 महिला आहेत.

कुरार व्हिलेज, वाकोला, पवई, मालवणी आणि साकिनाका हे भाग हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहेत. कारण या ठिकाणांहून अनेक तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत, अशी माहिती मिड डेने दिली आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या अहवालाचा हवाला देताना, जून ते डिसेंबर या कालावधीत मुंबईत 134 मुले बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

एकूण बेपत्ता प्रकरणांमध्ये 18 वर्षांच्या मुलांची संख्या जास्त असून त्यापैकी 41 मुली आणि 13 मुले आहेत. या यादीत लहान मुली जशा की पाच वर्षांच्या देखील बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर  11 वर्षांच्या मुलांचे प्रकरण सर्वाधिक आढळले.

सोमवारी (8 डिसेंबर) नालासोपाऱ्यातील टाकी पाडा परिसरात एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. हा मुलगा, मेहताज मुस्तफा शेख, नालासोपारा (पश्चिम), इथल्या इमारतीतील रहिवासी होता. तो 3 डिसेंबरपासून बेपत्ता होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, मेहताज 3 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास कोणालाही न सांगता घराबाहेर पडला होता.


हेही वाचा

लग्नाचे वय नसतानाही लग्नाची घाई, तरुणाचे टोकाचे पाऊल


वसईतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com