Tuesday, December 23, 2025
HomeSportsनेरुळ-मुंबई फेरीबोट 'या' तारखेला सुरू होणार

नेरुळ-मुंबई फेरीबोट 'या' तारखेला सुरू होणार



नेरुळ मुंबई फेरीबोट 039या039 तारखेला सुरू होणार.1578947368421&height=2448&w=768&width=1632

नवी मुंबईतील (navi mumbai) दीर्घकाळापासून रखडलेल्या जलवाहतुकीचे पुनरुज्जीवन अखेर आकार घेत आहे.

बहुप्रतिक्षित नेरुळ-भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा 15 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.

सिडकोने बांधलेल्या नेरुळ पॅसेंजर वॉटर टर्मिनल (NPWT) साठी हा शुभारंभ एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

नवीन फेरी सेवेमुळे क्रॉस-हार्बर प्रवासाचा वेळ सध्याच्या 90 मिनिटांवरून जवळपास 30 मिनिटांपर्यंत कमी होईल. 

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या मार्गावर 20 आसनी बोट (boat) चालवली जाणार आहे. या बोटीचे दैनंदिन चार फेऱ्या होणार आहेत. या फेरीचे भाडे प्रति प्रवासी 935 रुपये असेल.

सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाँचसाठी सागरी अधिकाऱ्यांकडून अंतिम मंजुरी वेळेत मिळण्याची अपेक्षा आहे.

सुमारे 150 कोटी रुपये खर्चून बांधलेले आणि 2023 मध्ये उद्घाटन झालेले नेरुळ टर्मिनल पाण्याची अपुरी खोली, प्रलंबित परवानग्या आणि अनेक अयशस्वी निविदा यामुळे जवळजवळ तीन वर्षे निष्क्रिय राहिले.

या वर्षी अखेर नेरुळ (nerul) -एलिफंटा मार्गावर सेवा सुरू झाल्या आहेत. परंतु प्रवासी संख्या अत्यंत कमी राहिली आहे. गेल्या महिन्यात सुमारे 60 प्रवाशांनी येथून प्रवास केला आहे.


RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com