Sunday, November 16, 2025
HomeSportsमुंब्रात स्थानिक खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारणार

मुंब्रात स्थानिक खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारणार



मुंब्रात स्थानिक खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारणार.1578947368421&height=1632&w=768&width=2448

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार एक नवी क्रिकेट अकादमी उभारण्याच्या तयारीत आहे. ही अकादमी लवकरच मुंब्रा आणि ठाणे परिसरातील इच्छुक क्रिकेटपटूंकरिता खुली होणार आहे.

ही अकादमी मौलाना अबुल कलाम आझाद टीएमसी स्टेडियमजवळील पाच एकर जागेवर उभारली जाणार आहे. 

प्रस्तावित अकादमीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील, ज्यामध्ये क्रिकेट मैदान, तसेच टेनिस कोर्ट, ड्रेसिंग रूम, स्विमिंग पूल आणि जिम यांचा समावेश असेल.

या अकादमीत या भागातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. अशा खेळाडूंना रणजी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची इच्छा असली तरी महागड्या क्रिकेट अकादमींमध्ये प्रवेश घेणे परवडत नसते.

मुंब्रा येथील यासिन शेख सध्या मुंबई रणजी संघाच्या अंडर-19 संघात खेळत आहे. एमसीएला आशा आहे की या नव्या अकादमीमुळे अशेच आणखी अनेक प्रतिभावान खेळाडू घडतील.

ठाणे महानगरपालिकेने (TMC) या प्रकल्पास मंजुरी दिली असून, एमसीएला सुमारे ७.५ कोटी रुपयांच्या भाडेपट्टीवर ही जमीन दिली आहे.

तसेच एमसीएने नोंदणीसाठी ४० लाख रुपये आधीच खर्च केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा लवकरच पार पडणार आहे.

अहवालानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मंजूर केल्या आहेत.

तथापि, या प्रकल्पाच्या पूर्णतेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. क्रिकेट अकादमी उभारण्याची कल्पना गेली २० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com