Tuesday, February 24, 2026
HomeSportsMumbai's fifth metro line to be inaugurated

Mumbai’s fifth metro line to be inaugurated



Mumbais fifth metro line to be inaugurated.1578947368421&height=683&w=768&width=1024

मुंबईमध्ये (mumbai)  ठिकठिकाणी मेट्रो (mumbai metro) मार्गिकांची कामं सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीन (mmrda) अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो2 ब (metro 2B) या मार्गिकेचं काम सुरू आहे.

या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा लवकरच सेवेत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 22 किलोमीटर लांबीच्या आणि 22 स्टेशन्सचा समावेश असलेल्या ‘मेट्रो 3 ब’ या मार्गिकेचं काम एमएमआरडीए दोन टप्प्यात करत आहे.

मंडाले ते डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन ते मंडाले, असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे.

दिल्लीतील मेट्रो रेल्वे सुरक्षेच्या (CMRS) मेट्रो आयुक्तांच्या पथकाकडून काही दिवसांपासून चाचण्या देखील सुरू होत्या. आता मेट्रो आयुक्त प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्यानंतर या मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल.

येत्या काही दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

मंडाले ते डायमंड गार्डन मेट्रो सुरू झाल्यास मुंबईतील वाहतूक सेवेत दाखल होणारी ही पाचवी मार्गिका ठरणार आहे. याबाबत एमएमआरडीएकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


हेही वाचा

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com