Tuesday, February 24, 2026
HomeSportsमुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली?

मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली?



मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली.1578947368421&height=768&w=768&width=1368

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारीही (18 ऑगस्ट 2025) आपला जोर कायम ठेवला. सकाळी 6:00 ते दुपारी 2:00 या वेळेत मुंबईतील विविध भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. प्रभागनिहाय (Ward-wise) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दादर, चेंबूर आणि वर्सोवा परिसरात सर्वाधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात सर्वाधिक पाऊस दादरमधील एसडब्ल्यूडी वर्कशॉप येथे झाला आहे. इथे 173.4 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ वरळी फायर स्टेशन येथे 170.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय  बी नाडकर्णी पार्क म्युनिसिपल स्कूल, वडाळा येथे 165.0 मिमी आणि आदर्श नगर स्कूल, वरळी येथे 161.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरात (Eastern Suburbs) चेंबूरमधील फायर स्टेशन येथे 177.2 मिमी पावसाची नोंद झाली असून, हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. नूतन विद्या मंदिर येथे 147.4 मिमी, विक्रोळी पश्चिम येथील बिल्डिंग प्रपोजल ऑफिस येथे 145.8 मिमी आणि चेंबूरमधीलच कलेक्टर कॉलनी येथे 145.6 मिमी पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरात (Western Suburbs) वर्सोवा डब्ल्यूडब्ल्यूटीएफ आणि लगून्स येथे 149.4 मिमी पाऊस झाला. बांद्रा फायर स्टेशन येथे 145.0 मिमी, वर्सोवा पंपिंग स्टेशन येथे 137.4 मिमी, खार दांडा म्युनिसिपल स्कूल, पाली हिल येथे 131.0 मिमी आणि बीकेसी फायर स्टेशन येथे 127.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर


मुसळधार पावसात चेंबुरमध्ये भिंत कोसळली

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com