बदलापूर
बदलापूर शिरगाव येथील सुरवळ चौकातील मोहन व्हीला या तेरा मजली इमारतीचे काम सुरू असताना जे आज दुपारी तीनच्या दरम्यान प्रमोद रामलाल खाडिया हा मजूर खाली पडून गंभीर जखमी झाला होता त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचार नेण्यात आले मात्र गंभीर असल्याने त्यास मुंबई येथील केईएम हॉस्पिटल येथे हलविण्यात येत होते यादरम्यान मजुराचा मृत्यू झाला.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांनी कळविल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन अपघात मृत्यू अशी नोंद केली आहे. मोहन ग्रुपच्या बदलापुरात असंख्य इमारती बांधकाम सुरू असून सदर इमारतींना बांधकाम करताना कोणतीही सुरक्षितेची जाळी लावण्यात आली नव्हती तसेच तेराव्या मजल्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक यंत्रणा देण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे बदलापुरात होणाऱ्या वारंवार इमारतींचे बांधकामाच्या ठिकाणी मजुरांची अपघाताने हत्या होत आहे असे असताना पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पोस्ट कारवाई आरोपींवर करत नसल्यामुळे अशा प्रकारच्या गरीब मजुरांची बदलापुरात अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे
बदलापुरात पोलिस यंत्रणा या संदर्भात अधिक चौकशी करत असून योग्य ती कारवाई करू असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे