Sunday, December 7, 2025
HomeSports5 जुलैला एकत्र जल्लोष मोर्चा होणार: उद्धव ठाकरे

5 जुलैला एकत्र जल्लोष मोर्चा होणार: उद्धव ठाकरे



5 जुलैला एकत्र जल्लोष मोर्चा होणार उद्धव ठाकरे.1578947368421&height=768&w=768&width=1368

हिंदीच्या सक्तीविरोधात मराठी माणसाच्या आंदोलनाने सरकारला अध्यादेश मागे घ्यावा लागला. सर्वच मराठीजनांनी 5 तारखेला मोर्चाची हाक दिली होती मात्र मराठी माणसांची एकजूट होऊ नये यासाठीच मोर्चाला घाबरून सरकारने अध्यादेश रद्द केला.
मात्र असे असले तरी 5 तारखेला जल्लोष मोर्चा होणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शासनाच्या अध्यादेश रद्द करण्याच्या घोषणेनंतर ५ तारखेचा मोर्चा होणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी जल्लोष मोर्चा किंवा सभा होईल, असे स्पष्ट केले. तसेच सगळ्यांनी बोलून दोन दिवसांत मोर्चा आणि सभेचे ठिकाण आणि वेळ जाहीर करू, असेही सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज पूर्ण राज्यभर आंदोलन झाले. शासनाच्या जीआरची ठिकठिकाणी होळी करण्यात आली. मुंबईत पत्रकार संघासमोरील प्रांगणात मी आंदोलनात सहभागी झालो. मला अभिमान आहे की मराठी माणसांच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. अशीच शक्ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी दिसली होती. तेव्हाही त्यांचा डाव उधळला होता, आजही उधळला.

आजही मला वैषम्य वाटते, मराठी माणसांची एकजूट तोडण्याचे काही जणांकडून प्रयत्न सुरूच आहेत. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी छान भूमिका घेतली की हिंदीला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. मराठी-अमराठी वाद निवडणुकीच्या तोंडावर सरकारला उभा करायचा होता, पण मराठी माणसाने तो हाणून पाडला.


RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com