Monday, July 14, 2025
HomeLifestyleHealthBadlapurCity | जनतेसाठी दिलासा – बेलवली, बदलापूर येथे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरू

BadlapurCity | जनतेसाठी दिलासा – बेलवली, बदलापूर येथे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरू

बदलापूर येथे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरू

बदलापूर (प्रतिनिधी) – बदलापूर पश्चिमेतील बेलावली परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. बेलावली वॉटर ऑफिस रोड, गाळा क्रमांक ०७, श्री मेडोज बिल्डिंग येथे ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र’ आता सर्वसामान्य जनतेच्या सेवेत सुरू झाले आहे. अत्यंत कमी किमतीत दर्जेदार औषधे व वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून देणारे हे केंद्र आता बदलापूरकरांसाठी एक मोठे वरदान ठरू शकते.

जनऔषधी केंद्र ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून, यामध्ये सामान्य जनतेला उच्च दर्जाची जनरिक औषधे बाजारभावाच्या तुलनेत अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिली जातात. औषधांच्या बिलावर जास्तीत जास्त बचत करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरत आहे.

या केंद्रात खालील प्रकारची औषधे व उपकरणे मिळणार आहेत:

  • रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रणासाठी औषधे
  • डायबेटीस संबंधित औषधे
  • कॅन्सरविषयक औषधे
  • इंजेक्शन्स
  • शस्त्रक्रिया (सर्जिकल) संबंधित सामग्री
  • आयुर्वेदिक औषधे
  • प्रोटीन पावडर
  • नेब्युलायझर मशीन
  • बीपी मशीन
  • शुगर तपासणी मशीन
  • सर्व प्रकारचे बेल्ट (कंबर, मानेचा, पोटाचा, पायाचा, हाताचा इत्यादी)
  • लहान व मोठ्या वयोगटासाठी डायपर्स
  • आणि इतर वैद्यकीय व आरोग्यविषयक वस्तू स्वस्त दरात

हे केंद्र नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार औषधे उपलब्ध करून देईल. तसेच, कोणत्याही आजारासाठी महिनाभर लागणाऱ्या औषधांची नोंदणी व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येऊ शकते. यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल:

Contact 9404056832 / 9623723003

ही सेवा खास करून बदलापूर पश्चिमेतील बेलावली, मांजर्ली रोड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला अत्यावश्यक औषधे परवडणाऱ्या किमतीत मिळावीत यासाठी केंद्र सरकारने ही योजना प्रभावीपणे राबविली आहे.

केंद्राचे व्यवस्थापन करत असलेल्या प्रतिनिधीने सांगितले की, “आमचे उद्दिष्ट म्हणजे कोणत्याही वर्गातील व्यक्तीला औषधांपासून वंचित राहावे लागू नये. गरीब व गरजू लोकांसाठी हे केंद्र मदतीचा एक हात पुढे करत आहे.”

स्थानिक नागरीकांनी या केंद्राचे स्वागत केले असून अनेकांनी अशा केंद्राची आवश्यकता पूर्वीपासून जाणवत असल्याचे सांगितले. “आम्ही यापूर्वी औषधांसाठी लांब अंतरावर प्रवास करावा लागायचा. आता इथे जवळच योग्य दरात औषधे मिळत असल्याने आर्थिक बचत होईल,” असे मत एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केले.

पत्ता:
दुकान क्रमांक ०७, श्री मेडोज अपार्टमेंट, वॉटर सप्लाय ऑफिसच्या मागे, मांजर्ली रोड, बेलवली, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३

या केंद्रामार्फत केवळ औषधेच नव्हे, तर जनजागृती व आरोग्य शिक्षणासंबंधित माहिती देखील दिली जाणार असल्याने समाजात आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडवण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com